पोलिसांना दंगल नियंत्रणबाबत प्रशिक्षण
शिक्रापूर-कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे दोन वर्षापूर्वी झालेल्या दंगलीमुळे मागील वर्षापासून पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे या परिसरात पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात येत असून आता पोलिसांकडून दंगल रोखण्यासाठी रंगीत तालीम घेण्यात आली.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील हॉटेल तोरणा समोर करण्यात येणाऱ्या पार्किंग परिसरात बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पाच पोलीस अधिकारी आणि पस्तीस कर्मचारी यांची रंगीत तालीम घेतली. यावेळी दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाल्यास परिस्थितीला सामोरे कसे जावे, परिस्थिती नियंत्रणात कशी आणावी याबाबतच्या उपाययोजना सदर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी सहा आश्रूधुरांच्या कांड्यांचा वापर करण्यात आला. यावेळी शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर, विक्रम साळुंके, गणेश वारुळे, मनोज निलंगेकर, शिवशांत खोसे, पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी आदी यावेळी उपस्थित होते.
- यशस्वी बंदोबस्तातील अधिकारी पुन्हा रुजू-
कोरेगाव भीमा येथील दंगलीनंतर मागील वर्षी मोठ्या बंदोबस्तात कार्यक्रम शांततेत पार पडला. त्यावेळी पोलीस महासंचालकांनी गौरविलेले सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, मनोज निलंगेकर, शिवशांत खोसे सदर बंदोबस्त शांततेत पार पाडण्यासाठी विशेष नेमणुकीवर दहा दिवसांसाठी रुजू करण्यात आले आहेत.