भुईमुग शेंगा, कांदा व कोबीची विक्रमी आवक ः फ्लॉवर, भेंडी व बटाट्याचे भाव तेजीत
महाळुंगे इंगळे- खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये जळगाव भुईमुग शेंगा, कांदा व कोबीची विक्रमी आवक झाली. बटाटा, लसूण, हिरवी मिरची व भेंडीची किरकोळ आवक झाली. फळभाज्यांच्या बाजारात कोबी, कारली व लसणाचे भाव स्थिर राहिले. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर व शेपू यांची भरपूर आवक झली. पालक भाजीची आवक घटली. जनावरांच्या बाजारात जर्शी गाय, बैल, म्हैस व शेळ्या मेंढ्याच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने त्यांचे भाव या आठवड्यात स्थिर राहिले. एकूण उलाढाल 3 कोटी, 50 लाख रुपये झाली.
चाकण बाजारात कांद्याची एकूण 2,500 क्विंटल आवक झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 1,340 क्विंटलने वाढल्याने कांद्याच्या भावात 1 हजार रुपयांची घट झाली. कांद्याचा कमाल भाव 8 हजार रुपयांवरून 7 हजार रुपयांवर स्थिरावला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक 1,600 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 100 क्विंटलने घटल्याने भावात 500 रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव 1 हजार 700 रुपयांवरून 2 हजार 200 रुपयांवर पोहोचला.
जळगाव भुईमुग शेंगांची एकुण आवक 7 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 3 क्विंटलने वाढल्याने भावात 300 रुपयांची घट झाली. या शेंगाचा भाव 6 हजार 800 रुपयांवरून 6 हजार 500 रुपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक 3 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 2 क्विंटलने घटूनही लसणाचा कमाल भाव 15 हजार रुपयांवर स्थिरावला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक 395 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 77 क्विंटलने घटूनही भावात घट झाली. या आठवड्यात हिरव्या मिरचीला 1 हजार 500 ते 2 हजार 500 रुपये असा कमाल भाव मिळाला.
- शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे –
कांदा – एकूण आवक – 2,500 क्विंटल. भाव क्रमांक 1. 7,000 रुपये, भाव क्रमांक 2. 6,000 रुपये, भाव क्रमांक 3. 3,000 रुपये.
बटाटा – एकूण आवक – 1,600 क्विंटल. भाव क्रमांक 1. 2,200 रुपये, भाव क्रमांक 2. 1,800 रुपये, भाव क्रमांक 3. 1,500 रुपये. - फळभाज्या – चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती 10 किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे :-
टोमॅटो – 1,150 पेट्या ( 500 ते 1,000 रू. ), कोबी – 495 पोती ( 600 ते 1,000 रू. ), फ्लॉवर – 372 पोती ( 1,000 ते 1,600 रु.), वांगी – 745 पोती ( 1,000 ते 2,000 रु.), भेंडी – 425 पोती ( 3,000 ते 4,000 रु.), दोडका – 365 पोती ( 2,500 ते 3,500 रु.), कारली – 240 डाग ( 2,000 ते 3,000 रु.), दुधीभोपळा – 545 पोती ( 500 ते 1,000 रु.), काकडी – 394 पोती ( 1,000 ते 1,600 रु.), फरशी – 222 पोती ( 1,500 ते 2,500 रु.), वालवड – 362 पोती ( 1,500 ते 2,500 रु.), गवार – 156 पोती ( 4,000 ते 6,000 रू.), ढोबळी मिरची – 690 डाग ( 1,500 ते 2,500 रु.), चवळी – 224 पोती ( 1,500 ते 2,500 रुपये ), वाटाणा – 735 पोती ( 2,500 ते 3,500 रुपये ), शेवगा – 30 पोती ( 5,000 ते 8,000 रुपये ), गाजर – 270 पोती ( 2,500 ते 3,500 रु.),
पालेभाज्या – चाकण येथे पालेभाज्यांच्या प्रती शेकडा जुड्यांना मिळालेला भाव पुढीलप्रमाणे : –
- मेथी – 52 हजार 650 जुड्या ( 300 ते 500 रुपये ), कोथिंबीर – 29 हजार जुड्या ( 300 ते 600 रुपये ), शेपू – 3 हजार 500 जुड्या ( 400 ते 700 रुपये ), पालक – 4 हजार 550 जुड्या ( 300 ते 500 रुपये ).
राजगुरुनगर पालेभाज्या – मेथी – 1 लाख, 70 हजार जुड्या ( 201 ते 700 रु.), कोथिंबीर – 1 लाख, 25 हजार जुड्या (100 ते 500 रुपये), शेपू – 12 हजार जुड्या ( 301 ते 801 रुपये ),.
शेलपिंपळगाव पालेभाज्या – मेथी – 2 हजार जुड्या ( 300 ते 800 रुपये ), – एकूण 2 हजार 500 जुड्या ( 600 ते 1,300 रुपये.),. - जनावरे – चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 130 जर्शी गायींपैकी 90 गाईची विक्री झाली. ( 10,हजार ते 60,हजार रुपये ), 160 बैलांपैकी 95 बैलांची विक्री झाली.( 10 हजार ते 35 हजार रुपये ), 210 म्हशींपैकी 165 म्हशींची विक्री झाली. ( 20 हजार ते 60 हजार रुपये ), शेळ्या – मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 7,920 शेळ्या – मेंढ्यापैकी 7,140 मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना 1,200 ते 10 हजार रुपये इतका भाव मिळाला.