पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात गेल्या 24 तासात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे या धरणसाखळी मधील चारही धरणात तब्बल 2 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.
बुधवारी सकाळी या धरणामध्ये 12.23 टीएमसी पाणीसाठा होता तो शुक्रवारी सकाळी 14.24 टीएमसी झाला आहे. तर खडकवासला धरण 72 टक्के भरले आहे.
मागील 24 तासात खडकवासला धरणात 38 मिमी, पानशेत धरणात 153 मिमी , वरसगाव धरणात 155 मिमी तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुमारे 250 मिमी पावसाची नोंद झाली आहे.