नवी दिल्ली – 1 ऑक्टोबर 2022 पासून स्वच्छ इंधनावर 2 रुपये प्रति लीटरने उत्पादन शुल्क लावले जाणार आहे. एक्स्ट्रा प्रिमियम सारख्या पेट्रोलचा समावेश शुद्ध इंधनामध्ये केला जातो.
कार्बन उत्सर्जन कमी करण्यासोबत आयातीवरील अवलंबित्व घटवण्यासाठी पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल असावे असा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी 2025 पर्यंत लक्ष्य निर्धारीत करण्यात आले आहे. आधी ही मुदत 2030 पर्यंत करण्यात आली होती. उस, गहू आणि तांदूळ आणि खराब झालेल्या अन्नधान्यापासून इथेनॉल काढले जाते. यामुळे प्रदुषण कमी होते आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन मिळते.
गेल्या वर्षी सरकारने 2022 पर्यंत पेट्रोलमध्ये 10 टक्के तर 2030 पर्यंत 30 टक्के इथेनॉलचा समावेश असावा असे लक्ष्य ठेवले होते. सध्या हे प्रमाण 8.5 टक्के आहे. 2014 मध्ये हे प्रमाण फक्त 1 ते 1.5 टक्के होते. जेव्हा हे प्रमाण 20 टक्क्यांवर जाईल तेव्हा इथेनॉलची खरेदी वाढले. भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा तेलाची आयात करणारा देश आहे. जो मागणीच्या 85 टक्के तेल आयात करतो.