Karnatak Politics : जनता दल (धर्मनिरपेक्ष) म्हणजेच जेडीएस आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुमकुरू जिल्ह्यात संयुक्त समन्वय बैठकीदरम्यान जोरदार संघर्ष झाला. कर्नाटकातील या प्रकाराची सध्या संपूर्ण देशात चर्चा आहे.
भाजप-जेडीएस युतीचे उमेदवार सोमण्णा यांच्या प्रचारासाठी आयोजित निवडणुकीच्या सभेत थुरुवेकेरे येथे मंचावरच या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चकमक झाली. जेडीएस आमदार एमटी कृष्णप्पा यांनी भाजप नेते कोंडाज्जी विश्वनाथ यांच्यावर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवासाठी तेच जबाबदार असल्याचा आरोप केल्यानंतर ही घटना घडली. | Karnatak Politics
आधी जेडीएसमध्ये असलेले आणि नंतर भाजपमध्ये गेलेले विश्वनाथ यांनी सोमण्णा यांच्या विषयी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. या विषयी ते आणखी काही बोलण्याआधीच सोमण्णांनी त्यांना थांबवले. त्यावेळी विश्वनाथ यांचे कार्यकर्ते भडकले. त्यातून ही हाणामारी झाली. | Karnatak Politics
#WATCH | A clash erupted between JDS and BJP workers during a joint coordination meeting in Turuvekere, Tumakuru district yesterday#Karnataka pic.twitter.com/h14D7w0RTJ
— ANI (@ANI) March 26, 2024
कर्नाटकात भाजप आणि जेडीएस यांच्यात युती झाली आहे. पण कमी जागा दिल्यानेही जेडीएसचे कार्यकर्तेही नाराज आहेत. त्यातून आज लोकांपुढेच या दोन्ही पक्षांत संघर्ष उडाल्याने त्यातून या युती विषयी लोकांमध्ये चुकीचा संदेश गेला आहे. आता या प्रकरणात सारवासारवी करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंकडून सुरू आहे. | Karnatak Politics