जामखेड – येथील नगर रोडवरील अॅड.अल्ताफ शौकत शेख यांच्या घरांच्या बांधकामावरून सुमारे १ लाख ६७ हजार रुपयांच्या बांधकाम साहित्यांची चोरी झाली. या प्रकरणी ठेकेदार वसीम युनूस शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जामखेड शहरासह तालुक्यात चोरटयांनी डोके वर काढले आहे. अॅड. शेख यांच्या दोन मजली नवीन घराच्या बांधकामाचा ठेका घेतला असून बांधकामाकरिता लागणारे काही साहित्य स्वतःचे असून काही साहित्य भाड्याने घेतले होते.
दि २७ रोजी दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब ठोकण्याकरिता स्वतःकडील काही सेंट्रिंग प्लेट व भाड्याने आणलेल्या काही प्लेटा असे एकूण १७५ प्लेटा ठेवल्या होत्या. दि २८ रोजी बांधकामावर काम करण्यास गेलो असता सेंटिंग प्लेटा दिसून आल्या नसल्याने घरमालक शेख याना बोलावून शोध घेतला असता मिळून आल्या नाहीत. सुमारे १ लाख ६७ हजार रुपये किमतीच्या १७५ सेंट्रिंग प्लेटा व इतर साहित्य चोरीस गेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील करत आहेत.