नगर: गुरुजींचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

जुन्या पेन्शनचा प्रश्‍न सोडविण्याचे पालकमंत्री राम शिंदे यांचे आश्‍वासन

नगर: विना अनुदान व अंशतः अनुदान सेवेत असुनही जुन्या पेन्शन योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळण्याच्या मागणीसाठी शनिवार (दि.15) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री राम शिंदेसह आ.बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी समन्वय समितीचे महेंद्र हिंगे, आप्पासाहेब शिंदे, सुनील दानवे, संजय इघे, बद्रिनाथ शिंदे, बाबासाहेब बोडखे, रमाकांत दरेकर, हरिभाऊ भोंदे, सुनील भोर, विशाल तागड, जाकिर सय्यद, संजय भुसारी, चंद्रकांत चौगुले, सुनील पंडित, संजय लहारे, रमजान हवालदार, देवीदास खेडकर, बापूसाहेब जगताप, आनंद नरसाळे, आबासाहेब गायकवाड आदिंसह जिल्ह्यातील शिक्षक उपस्थित होते.यावेळी ना. शिंदे म्हणाले की, शिक्षकांच्या प्रश्‍नांची जाणीव असल्याने या अधिवेशनात शिक्षकांचा जुन्या पेन्शनचा प्रश्‍न सोडविण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

आंदोलनावेळी एकच मिशन, जुनी पेन्शनचा संदेश लिहिलेल्या गांधी टोप्या आंदोलनकर्ते शिक्षकांनी परिधान केल्या होत्या. प्रमुख शिक्षक नेते व समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची यावेळी भाषणे झाली. न्याय हक्काच्या मागणीसाठी शासन सकारात्मक भूमिका घेत नसल्याने 18 जूनपासून राज्यातील सर्व शिक्षक पाऊसाळी अधिवेशन काळात मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलनाचा सर्वानुमते निर्धार व्यक्त केला आहे.

31 ऑक्‍टोबर 2005 रोजी राज्य शासनाच्या सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा नंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती योजना लागू करण्याबाबतचे 13 मुद्दयांचे कारणे स्पष्ट करणारे निवेदन पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.