हडपसर – हडपसर विधानसभा काँग्रेस व आयडियल एज्युकेशन ट्रस्ट यांच्या वतीने
सय्यदनगर, हडपसर परिसरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सुमारे १३०० नागरिकांनी सहभाग नोंदवला. काँग्रेस पक्षाचे हडपसर ब्लॉक अध्यक्ष प्रा. शोएब इनामदार यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.
यावेळी आयडीयलचे संस्थापक- अध्यक्ष प्रा. शफी इनामदार, सचिव डॉ. मुसद्दीक इनामदार, ओबीसी शहराध्यक्ष साहिल केदारी, विठ्ठल गायकवाड, शकीला इनामदार, रमेश राऊत, अजित ससाणे, बाळासाहेब ससाणे, पुष्पा गायकवाड, जबीन सय्यद, रिफान इनामदार, नूर शेख, इम्रान शेख, अकबर शेख, अनिल मोरे, प्रा .शाम ससाणे, लालासाहेब शेख, रवी गागडे, ताहेर अन्सारी, ताजुद्दीन अन्सारी, मंदाकिनी नलावडे, शब्बीर कपासी, विद्यार्थी काँग्रेसचे सोहेल लांडगे आदी उपस्थित होते.
मोफत नेत्रतपासणी, चश्मेवाटप, औषधेवाटप, कान-नाक-घसा तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा समावेश करण्यात आला. उद्घाटन विद्यार्थी काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष आमीर शेख यांच्या हस्ते. तर समारोप काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे व ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुभाष वारे यांच्या उपस्थितीत झाला. विधानसभा परिसरातील सुमारे १३०० हुन अधिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे शिबिराचा लाभ घेतला. आयोजन हडपसर विधानसभा अध्यक्ष प्रा. शोएब इनामदार आणि संस्थेचे कार्याध्यक्ष फहीम इनामदार यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा इम्रान शेख यांनी केले.