सातारा – साताऱ्यात दिवसाढवळ्या एकाची दगडाने ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सातारा शहरातील दिव्यानगरी परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
संतोष ऊर्फ विठ्ठल सुळ. वय 45 असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीच्या शोधावर आहेत.
संतोष हे आज सकाळी अकराच्या सुमारास सातारा शहरातील दिव्य नगरी परिसरातील रस्त्यावरून जात होते. दरम्यान याठिकाणी अचानक आलेल्या एका टोळक्यानं सुळ यांचा रस्ता आडवला. व त्यांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने आणि दगडाने मारहाण करण्यास सुरुवात केली. हा हल्ला इतका भयंकर होता की सुळ घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडले.
दरम्यान, पोलिसांना या घटनेची माहिती मिळताची त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व सुळ यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्यांना मृत्यू झाला. पुढिल तपास पोलीस करत आहेत.