नवी दिल्ली – जागतीक संकेतानुसार भारतीय बाजारात बुधवारी सोन्याच्या दरात 402 रुपयांची घट होऊन सोन्याचा दर 48,116 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
तयार चांदीचा दर 528 रुपयांनी कमी होऊन 65,218 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात मात्र सोने आणि चांदीच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली.
आगामी काळात जागतिक पातळीवर महागाई वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सोन्याचा दर दीर्घ पल्ल्यात वाढू शकतो असे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.