चीनच्या लढाऊ विमानांची तैवानमध्ये घुसखोरी

तैपेई – तैवानच्या संरक्षणमंत्रीपदी अमेरिकेत प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तीची नियुक्‍ती करताच चीनच्या नऊ लढाऊ विमनांनी तैवानच्या हद्दीत घुसखोरी केली.

चीनच्या जे 16 एस बनावटीची चार आणि जे एच 7एस बनावटीच्या चार विमानांनी तैवानच्या नियंत्रणाखाली असलेल्या प्रतास बेटांवर घिरट्या मारल्या, या शिवाय इलेक्‍ट्रॉनिक वॉरफेअर विमानेही यात सहभागी झाली होती, अशी माहिती तैवानच्या संरक्षएण मंत्रालयाने शुक्रवारी दिली. एकून नऊ विमनांनी तैवानच्या हवाई हद्द ओलांडल्याचे ट्‌विट या मंत्रालयाने केले आहे.

या प्रकाराने हवाई दलाला सतर्क करण्यात आले असून विमानवेधी क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. अमेरिकेच्या लष्करी महाविद्यालयात शिक्षण घेतलेले राष्ट्रीय सुरक्षा विभागाचे महासंचालक चिऊ कुओ चेंग यांना संरक्षणमंत्री म्हणून येन डे फा यांच्या जागेवर बदलण्यात आले.

राष्ट्राध्यक्ष त्साई इंगवेन यांना अपेक्षा आहे की, चिऊ हे लष्कराच्या पूनर्रचनेचे काम वेगाने पूर्ण करतील. आपरंपारिक सामरिक शास्त्राचा वापर करताना उच्च तंत्रज्ञानाचा वापर, चीनचा हल्ल्याचा कोणताही प्रयत्न हाणुन पाडण्यासाठी हालत्या शस्त्रे यांच्यावर भर देण्याचे नियोजन आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.