भयंकर ! भारतात करोना विषाणूंचे तब्बल 7500 प्रकार; शास्त्रज्ञ म्हणतात…

हैदराबाद – करोना विषाणूच्या साथीचा उद्‌गम झाल्यापासून विषाणूंची हजारो रुपे किंवा प्रकार आढळले आहेत. वुहानमध्ये करोनाचा पहिला विषाणू सापडल्यानंतर आतापर्यंत एकट्या भारतातच सात हजार 569 प्रकार आढळले आहेत. अर्थात शास्त्रज्ञांनी तपासलेल्या या नमुन्यांची संख्या ही अपुरीच असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर ऍण्ड मोलेक्‍युलर बायोलॉजी या संस्थेने केलेल्या संशोधनात देशात करोनाचे सात हजार 569 प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ याच संस्थेच्या शास्त्रज्ञांनी पाच हजार विषाणूंच्या प्रकाराचे पृथ:करण पुरवले आहे.

विषाणूंच्या या प्रकारांमुळे अनेक देशात हाहाकार माजवला असला तरी भारतात त्याचा फारसा प्रभाव आढळला नाही. त्यात वेगाने संसर्ग करणाऱ्या इ 484 के आणि एन501वाय म्युटेशनचे प्रकार आढळले नाहीत.

मात्र त्याचे प्रमाण न आढळण्याचे कारण त्याचा माग काढण्यात आपण कमी पडलो आहोत. करोनाचे हे आणि अन्य प्रकार शोधण्यासाठी देशाने अचुकपणे त्याचा अनुक्रम लावला पाहीजे , असे मत या संस्थेचे संचालक डॉ. राकेश मिश्रा यांनी व्यक्त केला.

काही राज्यातच काही प्रकार
मिश्रा यांनी सांगितले की, करोनाचे काही प्रकार काही राज्यांतच प्रसार पावले. एन 440 के हा प्रकार दक्षिणेकडील राज्यात प्रसार पावला. त्यांच्या प्रसार निट समजावून घेण्यासाठी योग्य पाहणी आवश्‍यक आहे.

एक वर्षापुर्वी अस्तित्वात आलेल्या या विषाणूचे अनेक प्रकार अस्तित्वात आले आहेत. उदा. ए 3 आय हा एक प्रकार आहे. त्याचा प्रसार कमी वेगाने होतो. त्या तुलनेत ए 2 ए प्रकाराचा जगभरात सर्वत्र प्रसार झाल्याचे आढळले. हा प्रकार पहिल्यांदा जून 2020 मध्ये आढळला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.