बीजिंग – चीनने उभारलेल्या नवीन अंतराळ स्थानकाबाहेर आज दोन अंतराळवीरांनी प्रथमच “स्पेसवॉक’केला. या अंतराळ स्तानकाबाहेर कॅमेरा आणि काही उपकरणे बसवण्यासाठी या अंतराळवारांनी हा अवकाश भ्रमंती केली. 15 मीटर लांब रोबोटिक आर्मत्या मदतीने त्यांनी ही उपकरणे बसवली.
लीऊ बोमिंग आणि तांग होंगबो अशी या दोन चिनी अंतराळवीरांची नावे आहेत. चिनी सरकारी टिव्हीने त्यांच्या या स्पेसवॉकचे प्रक्षेपण देखील केले आहे. त्यांचा तिसरा सहकारी नील हायशेंग हा मात्र अंतराळ स्थानकामध्येच होता. लीऊ आणि तांग यांनी सुमारे 7 तास अंतराळ स्थानकाबाहेर घालवले.
हे अंतराळवीर 17 जून रोजी तीन महिन्यांच्या मोहिमेसाठी या अंतराळ स्थानकावर आले आहेत. चीनने मे महिन्यात मंगळावर पोहोचवलेल्या यानाच्या मोहिमेचाच भाग म्हणून हे अंतराळ स्थानक उभारण्यात आले आहे.
या स्थानकाचे पहिले मोड्युल तियानहे यावर्षी 29 एप्रिलला उभारण्यात आले होते. त्यानंतर अन्न आणि इंधन घेऊन जाणारा स्वयंचलित अंतराळ यान अवकाशात सोडण्यात आले होते. 17 जन रोजी लीऊ, तांग आणि नील हे तिघे या अंतराळ स्थानकावर पोहोचले होते.