पिंपरी -एप्रिल महिन्याच्या अखेरीस तापमानामध्ये मोठी वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या शरीराची अक्षरशः लाहीलाही झाली आहे. पुणे शहरापेक्षा चिंचवडमध्ये अधिक तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे पुणे शहरापेक्षाही चिंचवड हॉट ठरले आहे.
पुणे शहरामध्ये शुक्रवारी 40.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर चिंचवडमध्ये 41.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वेधशाळेने इतर ठिकाणी घेतलेल्या नोंदीनुसार लवळे (41.8), शिवाजीनगर (40.7)आणि पाषाण (40.8) आणि लोहेगाव (41.5) कमाल तापमान नोंदवले गेले. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार चिंचवडचे दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा 3 ते 5 अंशांनी जास्त होते.
महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उत्तरेकडील उष्ण आणि कोरडे वारे वाहत आहेत. आणखी तीन दिवस तापमान चढेच राहण्याची शक्यता आहे. याशिवाय, हवामान प्रणालीचा अभाव स्वच्छ आकाश आणि जास्तीत जास्त सौर किरणोत्सर्गाकडे नेत आहे, ज्यामुळे दिवसाचे तापमान सतत सामान्यपेक्षा जास्त राहणार आहे. दरम्यान, 2 मे नंतर पुणे, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील भागात सुरू असलेल्या उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळू शकेल असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.
======================