बीजिंग – तैवानच्या संदर्भात जपानने कोणताही हस्तक्षेप करू नये. तसे केल्यास जपानविरोधात उघड उघड युद्ध पुकारले जाईल आणि जपानला आण्विक प्रत्युत्तर दिले जाईल, अश उघड उघड धमकीच चीनमधील सत्तारुढ कम्युनिस्ट पार्टीने दिली आहे. एका व्हिडीओ संदेशाद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. चायनीज कम्युनिस्ट पार्टीशी संबंधित एका चॅनेलवर हा व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे.
अण्वस्त्र शून्य देशांविरधात अण्वस्त्रांचा वापर न करण्याच्या चीनच्या धोरणाला जपान हा अपवाद आहे, असे या व्हिडीओतून सूचित करण्यात आले आहे. “आम्ही अण्वस्त्रांचा पहिल्यांदा वापर करू, आम्ही अण्वस्त्रांचा सातत्याने वापर करू. जपर्यंत जपान दुसऱ्यांदा बिनशर्त शरणागती पत्करत नाही तोपर्यंत आम्ही हे करतच राहू.’ असे या व्हिडीओ संदेशात स्पष्टपणे म्हटले आहे.
हा व्हिडीओ 20 लाख जणांनी बघितल्यानंतर चीनच्या शिगुआ या प्लॅटफॉर्मवरून तो डिलीट करण्यात आला. मात्र नंतर या व्हिडीओच्या प्रती यूट्यब आणि ट्विटरवर अपलोड करण्यात आली असल्याचे तैवानमधील प्रसिद्धी माध्यमांनी म्हटले आहे.
तैवानच्या स्वयत्ततेला चीनकडून आव्हान
चीनच्या मुख्य भूप्रदेशाच्या अग्नेयेकडील 24 दशलक्ष लोकसंख्या असलेला तैवान हा पूर्णपणे चमच्या आधिपत्याखालील भूप्रदेश आहे, असा चीनचा दावा आहे. मात्र दोन्ही भूप्रदेशांवर गेल्या 7 दशकांपासून अधिक काळापासून स्वतंत्र सरकार अस्तित्वात आहे. दोन आठवड्यांपूर्वी जपानच्या अधिकाऱ्यांनी तैवानच्या स्वयत्ततेविषया प्रश्न उपस्थित केला होता.
जपानने तैवानचे रक्षण करायलाच पाहिजे, असे जपानचे उपपंतप्रधान तारो असो यांनीही म्हटले होते. चीनच्या दाव्याला तैवानने प्रथमपासूनच विरोध दर्शवला आहे. त्यासाठी तैवानने अमेरिकेसह अन्य बड्या देशांबरोबरचे आपले संबंध वाढवले आहेत. तैवानचे स्वातंत्र्य म्हणजे युद्ध अशी धमकीच चीनने दिली आहे. तैवानला धमकावण्यासाठी गेल्यावर्षी सप्टेंबरबासून चीनकडून वारंवार लढाऊ विमाने पाठवली जात आहेत.