जिउकुवान, (चीन): चीनने आज नवीन टेहळणी उपग्रह अंतराळात सोडला आहे. वायव्य चीनमधील जिउकुवान सॅटेलाईट लॉंच स्टेशनवरून दुपारी 3.18 वाजता हा उपग्रह अंतराळात सोडण्यात आला.
गॅओफेन 9 03 असे या उपग्रहाचे नाव आहे. लॉग मार्च 2 डी कॅरिअर रॉकेटच्या मदतीने हा उपग्रह सोडण्यात आला. हा एक ऑप्टिकल रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट आहे, या उपग्रहाचा उपयोग प्रामुख्याने भू सर्वेक्षण, शहर नियोजन, भूमीची अचूकता, रस्ता नेटवर्क डिझाईन, पीक उत्पन्नाचा अंदाज आणि आपत्ती निवारण व शमन यासाठी केला जाईल. तसेच बेल्ट अँड रोडच्या बांधकामासाठी माहिती देण्यात येईल.
त्याच वाहक रॉकेटमार्फत, दोन अन्य उपग्रहदेखील अवकाशात पाठविण्यात आले. त्यापैकी एक, झेजियांग विद्यापीठाने विकसित केलेला, पिको-उपग्रह आणि नॅनो-उपग्रह तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यासाठी वापरला जाईल.
तर बीजिंगमधील चायना हेड एअरोस्पेस टेक्नॉलॉजी कंपनीने विकसित केलेला अन्य उपग्रह जहाज आणि विमानांचे स्टेटस आणि “इंटरनेट ऑफ थिंग्ज’ या विषयावरील जागतिक माहिती गोळा करण्यासाठी वापरला जाईल.
लॉंग मार्च रॉकेटच्या सिरीजमधील हे 335 वे प्रक्षेपण होते.