शिनजियांग – चीनमधील शिनजियांगमध्ये एका इमारतीला गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागण्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. या, आगीचे कारण समजू शकले नाही.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शिनजियांगची राजधानी उरुमाई येथे एका अपार्टमेंटला आग लागल्याची रात्री उशिरा बातमी मिळाली. यानंतर पोलीस दल आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 9 जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला तीन तासानंतर यश आले.
China Coronavirus Updates : चीनमध्ये करोनाचा पुन्हा उद्रेक; एकाच दिवसात विक्रमी नव्या रूग्णांची नोंद
दरम्यान, गेल्या चार दिवसांतील आगीची ही दुसरी घटना आहे. 22 नोव्हेंबर रोजी हेनान प्रांतात एका खासगी कंपनीच्या प्लांटला आग लागली होती. यामध्ये 38 जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितालाही ताब्यात घेतले होते.