मुंबई – मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वांच्या आवडीचे जोडपे म्हणजे ‘प्रिया बापट’ आणि उमेश कामत. अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांमध्ये या दोघांनी एकत्र भूमिका साकारल्या आहे. आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच घर या दोघांही निर्माण केलं आहे. उमेश आणि प्रियाला प्रेक्षकांना ऑन अँड ऑफ स्क्रिन एकत्र बघायला नेहमीच आवडते.
हे जोडपे सोशलवर सक्रिय असून या दोघांच्या जोडीचे लाखो चाहते आहेत. त्यांच्या फोटोंना गमतीशीर व्हिडिओना नेटकरी कमेंट करतात. नुकताच प्रिया आणि उमेशचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओते दोघेही पावसात भिजतांना दिसत आहे.
एक ब्रँडचे सूटसाठी प्रिया आणि उमेश एकत्र उपस्थित होते यादरम्यान तेथे पाऊस आला. त्यावेळी दोघांनी पावसाचा मनमुराद आनंद घेतला. या व्हिडीओत दोघेही एकमेकांवर पाणी उडवताना दिसत आहेत. पावसाचा आनंद घेतांना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओ कमेंट केल्या आहेत. या जोडपाच्या व्हिडिओवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षावर केला आहे. प्रिया आणि उमेशच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर दोघेही नाटक, वेबसिरीज, चित्रपट आणि टीव्ही मालिका या चारही क्षेत्रात काम केलं आहे. तर प्रिया काही दिवसांपूर्वी ती ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेबसीरिजमध्ये झळकली होती.