मुंबई – अभिनेत्री अवनीत कौरने अवघ्या लहान वयात मोठे यश संपादन केले आहे. तिने सुरुवातीला अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्यानंतर ती मोठ्या पडद्यावरही झळकली आहे. नुकतेच तिने नवाझुद्दीन सिद्दीकीसोबत ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटामुळे ती चांगलीच चर्चेत आली. याशिवाय अवनीत सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. अनेक फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करत असते.
सध्या तिचे बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अवघ्या 21 वर्षाच्या अवनीतने हटके फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अवनीतने शॉर्ट रिव्हिलिंग निळ्या रंगाचा वन पीस परिधान केला आहे. हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंती पडले असून यावर लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. तर काहींंनी हॉट फोटोशूटमुळे तिच्यावर टीकाही केली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटामुळे ती चर्चेत आली. 23 जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात नवाझुद्दीन सिद्दीकी आणि अभिनेत्री अवनीत कौर मुख्य भूमिकेत आहे. मात्र या चित्रपटातील किसिंग सीनमुळे वाद निर्माण झाला होता. यात नवाजुद्दीने अवघ्या 21 वर्षाच्या मुलीसोबत लिपलॉक सीन केला आहे. यावरून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. मात्र यावरून नवाझुद्दीनने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले होते.