Priya Bapat New Show| अभिनेत्री प्रिया बापटने आपल्या अभिनयाने सिने इंडस्ट्रीत मोठे स्थान मिळवले आहे. तिच्या अभिनयासह सौंदर्याचे लाखो लोक चाहते आहे. मराठीनंतर आता प्रिया बापट एका हिंदी शोमध्ये झळकणार आहे. यात तिच्यासोबत अभिनेता बरुण सोबती महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
बरुण सोबती हे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. बरुणने ‘इस प्यार को क्या नाम दूं’ या शोमधून करिअरला सुरुवात केली. आजही प्रेक्षक त्याला ‘अंगद’ या नावाने ओळखतात. अलीकडेच तो ‘असुर 2’ या वेबसिरीजमध्ये दिसला होता.
सोनी लिव्हने ‘रात जवान है’ च्या शूटिंगची घोषणा केली आहे. या शोमध्ये बरूण सोबती, अंजली आनंद व प्रिया बापट यांसारखे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. यापूर्वी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सिनेमात रणवीरच्या बहिणीचं पात्र अंजली आनंद हिने साकारले होते. Priya Bapat New Show|
बरुण आगामी शो ‘रात जवान है’ मध्ये तो रोमान्स आणि कॉमेडी करताना दिसणार आहे. यामिनी पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडने बरुणच्या या शोची निर्मिती केली असून त्याचे दिग्दर्शक सुमीत व्यास आहेत. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर ‘रात जवान है’ हा एक रोमँटिक कॉमेडी असणार आहे.
View this post on Instagram
या शोमध्ये मैत्री, पालकत्व या गोष्टींसह आधुनिक जीवनातील आव्हानांच्या नवीन पैलूंचा अनुभव दिला जाणार आहे. या शोमध्ये विनोदी आणि भावनिक क्षणही पाहायला मिळतील. ‘रात जवान है’ चे दिग्दर्शन करण्याबाबत सुमित व्यासने आपला आनंद व्यक्त केला. Priya Bapat New Show|
”पालकत्वाची जबाबदारी अंगावर पडली की तारूण्य संपले असा जगातील सर्वांचा समज आहे. ‘रात जवान है’ हा समज मोडून काढण्याचे काम करते. ही तीन मित्रांची कथा आहे, जे मुलं झाल्यानंतर देखील त्यांच्यामधील मैत्री कायम ठेवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करतात. बरूण, अंजली व प्रिया तिघांसोबत काम करताना खूप धमाल वाटते, त्यांच्यामुळे सेटवर नेहमी उत्साही वातावरण असते,” असं सुमित व्यास म्हणाला.