एका मॉडेल आणि ब्यूटी ब्लॉगरने आपल्या ओठांवर मेहंदी लावली हे पाहून सगळे अवाक झाले. मेहंदी लावून तिच्या ओठांना ती नारंकी रंग देऊ पाहत होती. त्याच्या व्हीडियो तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. काही मिनीटातच हा व्हीडियो प्रचंड व्हायरल झाला. ब्रियानाह क्रिश्चनसन असं या मुलीचंं
नाव आहे. ती शिकागोची रहिवासी आहे.
……this a joke?pic.twitter.com/0PQE9K98pU
— ariya is playing ebg (@priyochannie) October 25, 2020
मेहंदी हे नैसर्गिक रंग आहे. ज्याचा वापर दक्षिण आशियामध्ये जास्त केला जातो. याचा वापर मेहंदी शुभ सोहळ्यांमध्ये हात, पाय आणि केसांना रंग देण्यासाठी केला जातोय मात्र कोणीतरी हीच मेहंदी ओठांना लावली असं पहिल्यांदाच घडतंय.
हा व्हीडियो तिने टिकटॉकवर शेअर केला होता. मात्र हाच व्हीडियो आता ट्वीटरवर व्हायरल होतो आहे. त्यात ब्रियानाह क्रिश्चनसन ओठांना मेहंदी लावताना दिसते आहे. त्यानंतर तासभऱ वाट बघताना दिसते आहे. तासाभरानंतर ज्यावेळी तिने मेहंदी काढली त्यावेळी तिचे ओठ नारंगी रंगाचे झाले होते.
दरम्यान, ती ओठांवर नेैसर्गिक रंग येण्यासाठी मेहंदी लावल्याचं म्हणते. मात्र ते काहीतरी वेगळेच झाल्यावर ती नेटकऱ्यांना विचारते की हे कसं दिसतं आहे. यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
Its so strong…they prolly gonna break out….and the smell too 😭
— Faithᴮᴱ☆ᵉˣᵒ🍓 (@lemonysodapop) October 25, 2020