छत्तीसगडमधील चकमकीत जवान शहीद

रायपुर – छत्तीसडच्या धमतरी जिल्ह्यात नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला. हा जवान सीआरपीएफचा होता. जिल्ह्यातील वन विभागात ही चकमक झाली. त्या जंगलात काही नक्षलवाद्यांचे वास्तव असल्याची बाब निदर्शनाला आल्यानंतर सीआरपीएफ आणि जिल्हा पोलिस फोर्स यांनी संयुक्तरित्या तेथे कारवाई केली त्यावेळी ही चकमक झाली. गेले तीन दिवस हे, जवान हा परिसर पिंजून काढत होते.

आज सकाळी त्यांचा अचानक मुकाबला नक्षलवाद्यांशी झाला. त्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार करून तेथून पळ काढला. त्यात हेड कॉन्स्टेबल हरिष चंद हे शहीद झाले तर दुसरा एक जवान जखमी झाला. कालच नक्षलवाद्यांनी बीएसएफच्या ताफ्यावर अचानक हल्ला करून चार जवानांना ठार मारले होते. त्या घटने पाठोपाठ ही घटना घडल्याने येथील नक्षलवादी गट आक्रमक झाल्याचे संकेत मिळत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.