नवी दिल्ली – चारा घोटाळा प्रकरणात कारावासाची शिक्षा भोगणारे आरजेडीचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या जामीन अर्जावर 10 एप्रिल रोजी सुनावणी घेतली जाणार आहे. लालूंनी जामीनासाठी या आधीच अर्ज केला आहे. त्यावर सीबीआयने 9 एप्रिल पर्यंत आपले म्हणणे सादर करावे अशी सुचना कोर्टाने केली आहे. त्यांचे म्हणणे सादर झाल्यानंतर 10 एप्रिल रोजी त्यांच्या जामीनाविषयी निर्णय घेतला जाणार आहे.
या खटल्यात कपिल सिब्बल हे लालूंच्यावतीने काम करीत आहेत. त्यांनी या अर्जावर त्वरीत सुनावणी घेण्याची मागणी कोर्टात केली. त्यावर सरकारच्यावतीने बोलताना सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की आम्हाला या याचिकेवर अभ्यास करून उत्तर द्यावे लागले. त्यावर न्यायालयाने त्यांना 9 एप्रिल पर्यंत आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले.