मोठी बातमी! नक्षलवाद्यांकडून 22 जवानांची हत्या; बस्तर विभागात माओवाद्यांचा ‘हल्ला’

विजापूर, दि. 4 – बिजापूरमध्ये काल माओवाद्यांशी झालेल्या चकमकीनंतर केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या सात जवानांसह 22 सुरक्षा कर्मचारी बेपत्ता आहेत, अशी माहिती सरकारी सूत्रांनी रविवारी दिली. यातील 23 कर्मचारी शनिवारी बेपत्ता होते . या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी या जंगलात जेथे चकमक उडाली तेथे आज सकाळी शोध पथके पाठवण्यात आली आहेत.

या पथकाला त्यांचे मृतदेह रविवारी सापडले, अशी माहिती राज्याचे पोलिस महासंचालक डी. एम. अवस्थी यांनी सांगितली. दरम्यान, बेपत्ता झालेल्या जवानांपैकी 17 जणांचे मृतदेह सुरक्षा दलांना रविवारी मिळाले. शनिवारी पाच जवान यात शहीद झाले होते. तर 30 जवान जखमी झाले आहेत.

दरम्यान केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महासंचालक कुलदीपसिंग हे छत्तिसगढला पोहोचले असून त्यांनी बेपत्ता जवानांमध्ये सात जण केंद्रीय राखीव पोलिस दलातील असल्याचे मान्य केले आहे. अन्य बेपत्ता कर्मचाऱ्यांमध्ये राज्याच्या जिल्हा राखीव दल आणि विशेष पोलिस दलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिस दलातील एक ज्येष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

रायपूर येथील अधिकाऱ्यांनी सांगितले की, विजापुरातील तारेम भागात गावात माओवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर खात्याकडून मिळाल्यानंतर त्या भागात 400 पोलिस पाठवण्यात आले. हिडमा त्या भागात असण्याची शक्‍यता होती. हा भाग राज्याची राजधानी रायपूर पासून 400 किमी दूर आहे.

सुरक्षा दलाचे जवान तेथे पोहोचताच माओवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. त्यानंतर चकमक उडाली. सुमारे तीन तास ही चकमक सुरू होती. त्यात सुरक्षा दलाचे पाच कर्मचारी मरण पावले. माओवाद्यांचीही मोठी प्राणहानी झाली असण्याची शक्‍यता आहे.

आम्ही आमच्या शहिदांचे मृतदेह घेऊन परत आलो. अन्य पथकही या भागातून परत आले. मात्र 20 जणांच्या गटाने केलेल्या या हल्लयाचे वर्णन करता येत नाही. शनिवारी दुपारी चार वाजल्यापासून गोळीबार थांबला आहे, असे या मोहीमेत सहभागी झालेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
केंद्रीय मत्री अमित शहा यांनी यानंतर ट्‌विट केले. त्यात त्यांनी शहीद झालेल्या जवानांचे बलीदान देश विसणार नाही असे म्हटले आहे.

हिमडमाच हल्ल्याचा सूत्रधार
नक्षलवादग्रस्त बस्तर विभागात गेल्या दहा दिवसांत हा झालेला दुसरा मोठा हल्ला होता. त्यात पाच जण ठार झाले होते. तर 12 जण जखमी झाले होते. पिपल्स लिबरेशन गेरीला आर्मीचा कमांडर हिडमा याच्या नेतृत्वाखाली हा हल्ला करण्यात आला असल्याचे मानण्यात येते. तो 2013 च अनेक महत्वाच्या हल्ल्यात सहभगी होता. त्यात किमान 27 जण ठार झाले. त्यात राज्यातील महत्वाच्या कॉंग्रेस नेत्यांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.