#NZvBAN : साऊदीची विक्रमी कामगिरी; न्यूझीलंडने मालिका जिंकली

ऑकलंड, दि. 2 -न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनण्याचा विक्रम साकार केला आहे. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याने 3 बळी घेत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. या सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशचा 65 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 असे निर्विवाद वर्चस्व राखले.

साऊदीने पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीला मागे टाकले. आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 98 बळी घेतले आहेत. टिम साऊदीच्या नावावर आता आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 99 बळींची नोंद झाली आहे. या कामगिरीत श्रीलंकेचा लसिथ मलिंगा अव्वलस्थानी असून त्याच्या नावावर 107 बळी घेतले आहेत.

प्रथम दर्जाच्या तसेच आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी वेस्ट इंडिजचा गोलंदाज ड्‌वेन ब्राव्होच्या नावावर आहेत. ब्राव्होने आतापर्यंत टी-20 कारकिर्दीत 515 बळी घेतले आहेत. मलिंगाने टी-20 क्रिकेटमध्ये 390 बळी घेतले आहेत. सुनील नरेनने 390 बळी घेतले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.