नगर, (प्रतिनिधी) – लग्न करण्यासाठी अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करणार्या तरुणाविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंग, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनगरात राहणार्या पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे.
मनोज शिरसाठ (पूर्ण नाव माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. सदरची घटना रविवार (दि. २५) रोजी सकाळी १० वाजता घडली. रविवारी सकाळी मनोज हा फिर्यादी जवळ आला व तु मला खुप आवडतेस मला तुझ्याशी लग्न करायचे आहे.
तु माझेशी बोलत नाहीस , माझ्याकडे पाहून हसत नाही, तसेच, मुलीचा वारंवार पाठलाग करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.