पिंपरी – फुगेवाडी येथील पवना नदीपात्रात भराव टाकणाऱ्या नऊ जणांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वखारे व इतर आठ जण भराव टाकत होते. आरोपींची संपूर्ण नावे समजु शकली नाहीत, सर्वजण कासारवाडी येथील रहिवाशी आहेत.
महापालिकेच्या अनधिकृत नियंत्रण विभागाचे उपअभियंता राजेंद्र डुंबरे यांनी फिर्याद दिली आहे. वखारे व अन्य आठ जणांनी पवना नदीपात्राच्या निळ्या पूरनियंत्रण रेषेत 4 जून 2020 रोजी अनधिकृतपणे भराव टाकला होता.
याबाबत त्यांना महापालिकेच्या वतीने नोटीस बजावण्यात आली होती. त्याकडे या सर्वांनी दुर्लक्ष केले. महापालिकेच्या आदेशाचे पालन न केल्याने डुंबरे यांच्या फिर्यादीवरुन या नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.