पुणे: पुण्यात पावसाने हाहा:कार माजवल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज पाहणीसाठी दाखल झाले. मात्र, अरण्येश्वर सोसायटीत चंद्रकांत पाटलांना स्थानिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. पाटील हे फक्त फोटोसाठी आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आणि घोषणाबाजी केली.
पालकमंत्री अरण्येश्वर सोसायटीत येण्याच्या पूर्वीच तेथील नागरिकांनी रास्तारोको केला होता. मात्र पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर रस्ता मोकळा करण्यात आला. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
शहरातील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषत: ओढे, नाले तुडुंब भरून अनेक ठिकाणी रस्ते, घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनके कुटुंब रस्त्यावर आले आहेत. आतापर्यंत १९ जणांनाच मृत्यू झाला असून ९ जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे.