तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – माळवाडी येथील ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची संचालक मंडळाची निवडणूक झाली. पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष माळवाडी गावचे चंद्रकांत निवृत्ती दाभाडे यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदी संभाजी किसन दाभाडे तर सचिवपदी अर्जुन बाळोबा आल्हाट यांची निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी एम. ए. कुलकर्णी यांनी काम पाहिले. त्यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित केले. निवडणुकीमध्ये एकूण ११ जागांसाठी निवडणूक झाली. त्यामध्ये संचालकपदी शहाजी भगवंत दाभाडे, सुनील ज्ञानोबा जाधव, अर्पण चंद्रकांत ढोरे, संदीप हिरामण दाभाडे, दत्तात्रेय रघुनाथ पोंदे, शुभम दत्तात्रेय आढागळे, जयश्री संभाजी मावळे, मंगल तानाजी दाभाडे यांची संचालकपदी निवड झाली.
या वेळी पतसंस्थेचे संस्थापक निवृत्ती बाबूराव दाभाडे, गीतांजली चंद्रकांत दाभाडे, ग्रामपंचायत सदस्य अनिता सुनील जाधव, मेघा सुनील पानसरे आदी उपस्थित होते. संस्थेचे व्यवस्थापक अभिजित काळे, व्यवस्थापक महेंद्र पचपिंड यांनी सूत्रसंचालन केले