आळेफाटा – नगर कल्याण तसेच नाशिक पुणे हायवे वरील मध्यवर्ती आळेफाटा मध्ये (दि. 6) नोव्हेंबर रोजी सलग आलेल्या दिवाळी च्या सुट्ट्यामुळे आपापल्या गावी जाण्याच्या निमिताने आळेफाटा या ठिकाणी ट्राफिक च्या गर्दीने जाम झाला.
ट्रॅफिक चा सुटकारा व्हावा यासाठी रस्ते प्रशासनाने आळेफाटा पासून बाहेरील बाजूस बायपास मंजूर केला असला तरी त्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आळेफाटा परिसरात अशी ट्रॅफिक ची गर्दी नेहमीच अनुभवास मिळते यामुळे प्रवाशांना नाहक गर्दीत अडकून पडावे लागते.
त्यात CNG पंप च्या ठिकाणी ही नेहमीच गॅस फिलिंग करण्यासाठी वेगवेगळ्या लाईन ला वहाने उभे केल्याने ही ट्रॅफिक जाम होत असल्याचे चित्र बघावयास मिळते. त्यामुळे प्रशासनाने बायपास मार्गाचे काम युद्ध पातळीवर करावे जेणेकरून ह्या ट्रॅफिक च्या समस्येतून सुटकारा मिळेल.