नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयातर्फे आज देशातील अनलॉक – ४ बाबतच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचना येत्या १ सप्टेंबर पासून लागू होणार आहेत. असं असलं तरी या मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारतर्फे देण्यात आल्या असल्याने राज्य सरकार कोरोना परिस्थिती अनुरूप यामध्ये काही बदल करू शकतात.
काय आहेत नव्या गाईडलाईन्स
१. देशभरातील मेट्रो सेवा श्रेणीबद्ध पद्धतीने ७ सप्टेंबरपासून सुरु
२. खुल्यावरील थिएटर्स २१ सप्टेंबरपासून सुरु करता येणार
३. सामाजिक, शैक्षणिक, खेळ, करमणूक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय व इतर कार्यक्रमांना दिनांक २१ सप्टेंबरपासून १०० जणांना उपस्थिती लावता येणार.
४. ३० सप्टेंबरपर्यंत शाळा व महाविद्यालये बंदच
५. कंटेनमेंट झोनबाहेरील ९ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना पालकांच्या सहमतीने शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्यासाठी शाळेमध्ये जाता येणार.
६. प्रयोग शाळेची आवश्यकता असलेल्या उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रयोग शाळा वापरण्याची परवानगी.
७. राज्यांतर्गत व देशांतर्गत प्रवासासाठी कोणतीही बंधने नाहीत. ई-पासची गरज नाही.
८. बंद सिनेमागृहे, इन्टरटेन्मेन्ट पार्क, स्विमिंग पूल बंदच.
९. सर्व कंटेनमेंट झोनमध्ये लॉक डाऊनचे नियम कायम राहतील.
१०. राज्य व केंद्रशासित प्रदेश इ-लर्निंग साहित्य निर्मितीसाठी ५० टक्के टिचिंग व नॉन टिचिंग स्टाफला परवानगी देऊ शकतात.