पुणे – पंतप्रधान जन औषधी योजने अंतर्गत जनऔषधी मेडिकलसाठी केंद्र सरकारकडून अडीच लाख रुपये अनुदान दिले जात आहे. या योजनेला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सरकारची ही योजना 700 जिल्ह्यांमध्ये सुरू झाली असून 6 हजार 200 जन औषध केंद्र सुरू झाले आहेत.
गरीब लोकांना आणि सामान्य लोकांना अगदी वाजवी दरात औषध उपलब्ध व्हावीत, असा उद्देश या योजनेचा आहे. हे मेडिकल दुकान सुरू करण्यासाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान देत आहे. याशिवाय औषधाच्या छापील किंमतीवर 20 टक्क्यांपेक्षा अधिक नफा मिळत आहे.
जनऔषधी केंद्र सुरू करण्यासाठी डॉक्टर, वकील, व्यापारी, शेतकरी, किंवा फार्मासिस्ट असल्यास लाभ घेऊ शकणार आहेत. विशेष म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आणि दिव्यांगांना औषध केंद्र सुरू करण्यासाठी 50 हजार रुपये दिले जातात. या योजनेतून केंद्र सरकार जनेरिक औषधांवर सुट देते.