मुंबई – कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केला आहे. दरम्यान, याच लॉकडाउनमध्ये सोशल मीडियावर विविध चॅलेंज ट्रेंड सुरु झाले आहेत. महिलावर्ग यामध्ये आघाडीवर असून, नुकतंच ‘नथीचा नखरा’ नावाचा नवीन ट्रेंड त्यांनी सुरु केला आहे.
नथीचा फोटो स्टेटसला टाकून आपल्या प्रिय मैत्रिणी तसेच नात्यातील स्त्रियांना चॅलेंज दिलं जात आहे. चॅलेंज मिळालेल्या स्त्रीनं ते स्वीकारुन आपल्या स्टेटसलाही नथ घातलेले स्वतःचे फोटो ठेवायचे असतात.
त्यामुळे सध्या व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्रामचे स्टेटस नथींच्या फोटोंनी भरुन वाहिलेले पहायला मिळत आहेत. दरम्यान, ‘नथीचा नखरा’ या चॅलेंजने सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच वेड लावलंय.