वाघोली – वाघोली तालुका हवेली येथे झोपडपट्टीत राहणाऱ्या गोर-गरीब गरजू मुलांना नवीन कपडे व खाऊचे वाटप करून महाराष्ट्राचे राज्यमंत्री बच्चू कडू यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव, अनिता कांबळे, सुप्रिया लोखंडे, नंदू कोळेकर यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले. गोरगरीब गरजूंना मदत करून सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबवून वाढदिवस साजरे करावेत असा संकल्प वेळोवेळी सामान्य नागरिकांमध्ये निर्माण करणाऱ्या राज्यमंत्री बच्चू कडू यांचा वाढदिवस वाघोलीत साधेपणाने साजरा करून एक आदर्श उभा केला असल्याचे प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांनी सांगितले.