वाघोली – सामाजिक बांधिलकी जोपासताना वेगवेगळी मिळालेली पदे त्यातून प्राप्त झालेली प्रतिष्ठा ही माणसाच्या कर्तुत्वाला उभारी देते हीच उभारी जनमानसातील होण्याचा खरा बहुमान असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील यांनी केले.
पंचायत समिती हवेलीच्या प्रभारी सभापतीपदी नारायण आव्हाळे यांची निवड झाल्याबद्दल आव्हाळवाडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी दादासाहेब सातव पाटील बोलत होते. याप्रसंगी आव्हाळवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच राहुल सातव , सामाजिक कार्यकर्ते संदीप सातव, युवा नेते मयूर सातव, वाल्मीक सातव, दत्ता खुळे, समीर सातव, गणेश सातव ,चंद्रकांत सातव,बबलू शेख आदी मान्यवर उपस्थित होते. याबाबत सातव यांनी सांगितले आव्हाळवाडी गावाच्या वैभवात भर पडणारी बाब म्हणजे नारायण आव्हाळे यांची पंचायत समिती हवेली च्या उपसभापती पदी वर्णी लागली होती.आता याच्यात आणखीन भर पडली असून त्यांच्याकडे प्रभारी सभापती कार्यभार सोपविण्यात आला असून त्याद्वारे पंचक्रोशीतील विविध विकास कामे होण्यास मदत होणार असल्याचे दादासाहेब सातव पाटील यांनी सांगितले.