वाडा – खेड तालुक्यामध्ये शिक्षकदिन विद्यार्थ्यांविना साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व अँड राम जनार्दन कांडगे कनिष्ठ महाविद्यालयात काही शिक्षकांच्या उपस्थितीत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्य शिवाजी दुंडे, ज्येष्ठ शिक्षिका रत्नप्रभा मोरे, शशिकांत पावडे, प्राध्यापक योगेश सोनवणे, प्रकाश साबळे, सुदाम असवले, शिला गोडे उपस्थित होते. प्राचार्यांनी शिक्षकांचे गुलाबपुष्प देवून सन्मानित केले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले आहे.