चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय शाहिद कपूर हा बॉलीवूडमधील सर्वाधिक व्यस्त अभिनेत्यापैकी एक आहे. त्याचे अनेक चित्रपट प्रदर्शित होण्याच्या प्रतीक्षेत असून काही चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. त्यातच तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर डेब्यू करणार असल्याने प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.
यानंतर आता शाहिदने आणखी एक चित्रपट साईन केला आहे. “भारत’, “सुलतान’ आणि “टायगर जिंदा है’ यांसारखे चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जाफरने आपल्या आगामी चित्रपटासाठी शाहिदला साइन केले आहे.
हा चित्रपट विदेशी चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. परंतु या चित्रपटाच्या नावाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. हा एक थ्रीलर चित्रपट असणार असून याचे शूटिंग अबुधाबी येथे होणार आहे.
अली अब्बास जाफर हे एक प्रभावशाली कथाकार आहेत. जे बॉलीवूडमधील दर्शकांसमोर उत्कृष्टपणे कथा सादर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. शाहिद हा त्यांच्या कामाने प्रभावित असून, त्यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्साहित आहे.
जेव्हा अलीने शाहिदला अप्रोच केले, तेव्हा शाहिदने त्यांना लगेच होकार दर्शविला. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास शाहिद “जर्सी’, “महाभारत’, “राज’ आणि “डीके’ या वेब सीरीजसह अनेक चित्रपटांत झळकणार आहे.