Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणूक 2024 च्या मतदानाच्या सहाव्या टप्प्यासाठीचा प्रचार काल २३ मेला थांबला आहे. या टप्प्यात 25 मे रोजी आठ राज्यांतील 58 जागांवर मतदान होणार आहे. दरम्यान यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्रात पाच टप्यात निवडणुका झाल्या, येत्या ४ जूनला सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल घोषित केले जातील.
अशात सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मोदी म्हणाले,’ देवानेच मला पाठवलं आहे. कारण, माझ्यामधील शक्ती ही साधारण नाही ती देवानेच मला दिलीये असं वाटतं. माझी आई जोपर्यंत जिवंत होती तोपर्यंत मला वाटायचं मी तिच्या पोटीच जन्म घेतलाय. पण, तिच्या निधनानंतर, मला विश्वास वाटायला लागला की माझ्यातील शक्ती ही साधारण नाही. देवानेच खास शक्ती देऊन मला पाठवलं आहे. माझ्याकडून काही तरी करून घेण्यासाठी त्याने मला पाठवलं आहे असं वक्तव्य मोदी यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत केले आहे.
यावर आता कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देतांना खिल्ली उडवली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कन्हैया कुमारच्या समर्थनार्थ एका जाहीर सभेला संबोधित केले, त्या दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या विधानावर भाष्य केले आहे. ते म्हणाले,’नरेंद्र मोदी एका मुलाखतीत म्हणतात की मी बायोलॉजिकल नाही. भारतातील सर्व लोक आणि प्राणी बायोलॉजिकल आहेत, परंतु नरेंद्र मोदी बायोलॉजिकल नाहीत. मोदीजी म्हणतात की देवाने मला पाठवले आहे आणि यावर त्यांचे चमचे म्हणतात, वाह, वाह, वाह, काय बोलले ते.
राहुल गांधींनी पीएम मोदींच्या विधानाची खिल्ली उडवत पुढे म्हटले की, “म्हणजे कोविडमुळे लोक मरत राहिले, ज्यांना देवाने पाठवले आहे, ते म्हणतात प्लेट वाजवा, मोबाईलचा लाईट चालू करा. मला सांग, देवाने कोणता माणूस पाठवला आहे?
पीएम मोदींच्या आणखी एका मुलाखतीचा संदर्भ देत काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, ‘एका मुलाखतीत पंतप्रधान मोदींना विचारण्यात आले होते की, भारतात श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत, यावर तुमचे मत काय आहे? पंतप्रधान मोदी 30 सेकंद विचार करून म्हणाले, मी सगळ्यांना गरीब करू का?’ अस म्हणत राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली आहे.
हे वाचाल का ?
‘देवानेच मला पाठवलंय, कारण माझ्यातील शक्ती ही दैवी…’ पंतप्रधान मोदींचे विधान चर्चेत