कात्रज –कात्रज घाट जुना रस्ता तसेच नवीन कात्रज बोगदा रस्त्यावर अपघात आणि खून करून मृतदेह टाकण्याच्या घटना गेल्या काही दिवसांत उघडकीस आल्याने पुणे-सातारा महामार्गासह बोगद्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पोलीस खात्याकडून करण्यात आली होती, त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नवीन कात्रज बोगदा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामाला सुरूवात केली आहे.
सातारा, सांगली, कोल्हापूर, कर्नाटकाकडे जाणारी वाहने कात्रज घाट जुना मार्गे आणि बाह्यवळण मार्गाचा वापर करतात. तसेच, पुणे-मुंबईकडे जाणारी अवजड वाहतूकही याचा मार्गाने अधिक प्रमाणात होते. ट्रॅव्हल्स् प्रवासी वाहनेही या मार्गाचा वापर करतात. हे मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत आहे तर जुना कात्रज घाट रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहेत. या भागात वनक्षेत्रही यामुळे गेल्या काही वर्षांत खून केल्यानंतर मृतदेह या भागात मोकळ्या जागेत टाकण्याच्या घटना घडत होत्या. यामुळे मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील जुना तसेच नवीन कात्रज बोगदा येथे सीसीटीव्ही कॅमेरे, पथदिवे बसविण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.