माजी विद्यार्थ्यांकडून सीसीटीव्ही कॅमेरे भेट

चाफळ – सन 2004-05 मधील दहावीतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सुमारे 10 वर्षांनंतर गेट टुगेदरच्या निमित्ताने एकत्र येत येथील श्री समर्थ विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज या विद्यालयास सीसीटीव्ही कॅमेरे भेट दिले आहेत. माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

दहा वर्षापूर्वी दहावीच्या वर्गात एकत्र शिकणाऱ्या मुला-मुलींना एकत्र आणून विचारांची देवाणघेवाण होण्याच्या हेतूने सागर वाघमारे याने व्हॉट्‌सऍप ग्रुप तयार केला. व दहा वर्षांपूर्वी आपल्या वर्गात असणाऱ्या मित्रमैत्रिणींचा शोध सुरू केला. या ग्रुपला आठवणीतील पाखरे असे नाव देण्यात आले. हळूहळू मित्रमैत्रीणींची ग्रुपमधील संख्या वाढू लागली. आणि यातून गेट टूगेदर घ्यायचे ठरविण्यात आले.

यासाठी पुरुषोत्तम पाटील, नहिदा मुल्ला व शुभांगी माने यांनी मित्रमैत्रीनी संपर्क साधत कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी या ग्रुपच्या माध्यमातून शाळेला भेट वस्तू म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे प्राचार्य एस. व्ही. मोरे यांचेकडे सुुपुर्द करण्यात आले. यावेळी विक्रम साळुंखे, कृष्णत मोळावडे, स्वप्नील पाटील, कल्याणी पाटील, डॉ. अभिजित पवार, विक्रम पाटील, प्रिया पाटील, विशाल कुंभार, रेश्‍मा पवार, निवेदिता माने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.