नवी दिल्ली – सीबीआयने शुक्रवारी निवृत्त सनदी आधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते हर्ष मंदर यांच्या निवासस्थानावर आणि कार्यालयावर छापे टाकले. प्राथमिक तपासाचा एक भाग म्हणून, एजन्सीने या प्रकरणाशी संबंधित अनेक लोकांची चौकशी केली, असे सूत्रांनी सांगितले.
यापूर्वी सप्टेंबर २०२१ मध्ये, अंमलबजावणी संचालनालयाने कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात मंदर यांच्याशी संबंधीत जागेवर छापे टाकले होते. ईडीच्या म्हणण्यानुसार, शहरातील त्याच्या निवासस्थानावर, कार्यालयावर आणि त्याच्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या बालगृहावर छापे टाकण्यात आले.
मंदर यांची अमन बिरादरी नावाची एक स्वयंसेवी संस्था आहे. त्यांना विदेशातून त्यांच्या कामासाठी निधी मिळतो. परंतु त्यात विदेशी योगदान नियमन कायद्याचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांच्या संस्थेची चौकशी करण्यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे पाठवले होते.
२०२१ मध्ये दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने भारतीय दंड संहितेच्या कलम विविध कलमान्वय मंदर यांच्या व त्यांच्या संस्थेतील अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते.