मुंबई – आरपीजी ग्रुप अर्थात रामनाथ प्रसाद गोएन्का स्थापित एक विविध उद्योगांची मालिका असलेला भारतातला एक मोठा कॉर्पोरेट ग्रुप आहे. या ग्रुपचे चेअरमन हर्ष गोएन्का यांनी ट्वीटरवर शेअर केलेला एक व्हिडीओ भलताच व्हायरल झाला आहे.
एका बंगल्याच्या टेरेसवरील कठड्यावर एक चक्क काळाकुळकुळीत कावळा रॅम्प वॉक करताना दिसतो आहे. माणसांची नक्कल करणारा बुद्धीमान पक्षी म्हणून आपण कावळ्याला ओळखतो. भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये पाहुण्यांच्या आगमनाची सूचना देण्यापासून मृत व्यक्तीच्या आत्म्याला सद्गती मिळाल्याचे द्योतक म्हणून कावळ्याच्या वर्तनाकडे पाहिले जाते. इथे व्हिडीओ अवश्य पहा…
Weekend blues…https://t.co/36dvDRX7Ye
— Harsh Goenka (@hvgoenka) March 27, 2021
असा एक कावळा फॅशन शोमधील मॉडेल्स अर्थात हॅंगर गर्ल्सची नक्कल करत रॅम्पवॉक करताना दिसल्याचा व्हिडीओ हर्ष यांनी ट्वीटरवर शेअर केला असून आता हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.