वाघोली – मांजरी खुर्द व कोलवडी परिसरामध्ये मागील पंधरा दिवसापासून बिबट्या फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मांजरी परिसरामध्ये बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली होती. वरिष्ठांच्या परवानगीने वनविभागाच्या वतीने सावज आणि पिंजरा शुक्रवारी (दि.13) लावण्यात आला आहे.
दरम्यान, मांजरी परिसरात बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. त्यामुळे पिंजरा लावून वनविभागाने तत्परता दाखविली आहे.