नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या भारतीय खेळाडूंवर आता बक्षिसांचा वर्षाव सुरू झाला आहे. विविध राज्यांतील सरकारने तसेच उद्योगजगत व अन्य क्रीडाप्रेमी संस्थांनी खेळाडूंना नोकरी, रोख रकमेचे पारितोषिक तसेच विविध सुविधा बक्षीस म्हणून देण्याच्या घोषणा केल्या आहेत.
देशातील सर्वात मोठी देशांतर्गत विमान कंपनी इंडिगोने शनिवारी नीरज चोप्राला गिफ्ट देण्याची घोषणा केली. टोकियो ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला इंडिगोकडून एका वर्षासाठी अमर्यादित मोफत प्रवास प्रदान करण्यात आलाय.
आम्ही तुम्हाला एक वर्षासाठी इंडिगो फ्लाईटमध्ये मोफत प्रवासाची सुविधा देऊ इच्छितो. मेहनत, आव्हानांचा सामना करण्याची क्षमता आणि उत्कटता काय करू शकते हे तुम्ही दाखवून दिलंत. मला खात्री आहे की, तुम्ही भविष्यातील भारतीय खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणार आहात, असं कंपनीने सांगितले.
दरम्यान नीरजला येत्या ७ ऑगस्टपासून इंडिगो फ्लाईटने मोफत प्रवास करता येणार आहे.