#carona : ‘सलमान खान’ची दबंग कामगिरी; कामगारांसाठी केला मदतीचा हात पुढे 

मुंबई – देशासमोर उभ्या असलेल्या कोरोनाशी लढा देण्यासाठी सरकारला मदत म्हणून उद्योजक, सिनेकलाकार, राजकीय नेते, बॉलीवूड कलाकार पुढे सरसावले आहेत. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार, वरून धवन, सनी देओल यांच्या पाठोपाठ आता बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच, अभिनेता सलमान खान’ने सुद्धा कोरोनाशी लढा देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

25,000 दैनंदिन वेतन कामगारांची जबाबदारी सलमानने स्वतःवर घेतली आहे. सलमानने त्यांना आर्थिक मदत करण्याचे तसेच त्यांच्या कुटुंबियांना अन्न व इतर वस्तू मिळण्याची खात्री करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती एका प्रसिद्ध वृत्तवाहिनी दिली आहे. सलमान नेहमीच समाजातील गरजूंना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करता असतो.

दरम्यान, अभिनेता अक्षय कुमार याने २५ कोटी रुपयांचा निधी मदत म्हणून केंद्र सरकारला देण्याची घोषणा केली आहे. ट्विटवरुन अक्षयने ही माहिती दिली. तर, अभिनेता वरून धवन याने मुख्यमंत्री सहायता निधीला २५ लाखांची मदत करण्याचं जाहीर केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर वरुणने ही घोषणा केली.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.