वाल्हेत मराठा समाजाच्या वतीने आनंदोत्सव

वाल्हे – न्यायालयाने मराठा आरक्षण कायम ठेवण्याचा निकाल दिल्यानंतर मराठा समाज बांधवांनी एकत्र येत फटाक्‍यांची आतषबाजी केली. तसेच एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वाल्हेचे माजी सरपंच दत्तात्रय पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

याप्रसंगी सरपंच अमोल खवले, शेतकरी संघटनेचे भाऊसाहेब भोसले, सुनील चव्हाण, गोरख कदम, हनुमंत पवार, डॉ. रोहिदास पवार, संदीप पवार, विजयकुमार पवार, सतीश भुजबळ, विकास पवार, सचिन देशपांडे, जगदीश पवार, कुलदीप पवार उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.