सेंट लुइस (अमेरिका) : भारताची बुध्दिबळपटू द्रोणावल्ली हरिका हिला कायर्न्स कप बुध्दिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीमध्ये बरोबरीवर समाधान मानावे लागले आहे.
सातव्या फेरीत झालेल्या लढतीत द्रोणावली हरिकाने अमेरिकेच्या कारिसा यिप हिच्याशी ४३ चालींनंतर बरोबरी साधली.
Carissa Yip and @HarikaDronavali draw in a relatively mistake-free game. This marks @CarissaChess's first draw of #CairnsCup pic.twitter.com/VB74bpZl9D
— Saint Louis Chess Club (@STLChessClub) February 14, 2020
दरम्यान, स्पर्धेच्या सहाव्या फेरीमध्ये हरिकाने चीनच्या वेंजुन जू हिच्याविरूध्द बरोबरी साधली होती तर पाचव्या फेरीमध्ये हरिकाला वेलेंटिना गुनिना हिने ३८ चालींमध्ये पराभूत केले होते.