Kishori Shahane : मराठमोळी अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी नवी कोरी कार खरेदी केली आहे. 2023 या वर्षात अनेक कलाकारांनी नवी कार, नव घर खरेदी केलं आहे. यातच आता किशोरी शहाणे यांनी देखील कार खरेदी केल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. कार खरेदी करत किशोरी शहाणे यांनी त्यांचे स्वप्नपूर्ण केले आहे.
किशोरी शहाणे यांनी आलिशान गाडीचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सोबतच कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, ‘आमच्या कुटुंबात नव्या सदस्याची एन्ट्री’. किशोरी यांनी आपल्या नव्या गाडीची पूजा केली आणि केक कापून सेलिब्रेशनही केलं. व्हिडीओमध्ये किशोरी शहाणे यांच्यासोबत त्यांचा मुलगा बॉबीही दिसत आहे. या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी आणि अनेक कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, ‘मोरूची मावशी’ या सुप्रसिद्ध व्यावसायिक नाटकाने त्यांना स्वतंत्र ओळख निर्माण करून दिली. या नाटकातील त्यांच्या भूमिकेचे सर्व स्तरावर कौतुक झाले. त्यानंतर “प्रेम करूया खुल्लम खुल्ला’ या चित्रपटाद्वारे त्यांनी त्यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील करियरला सुरुवात केली. पुढे त्यांनी एकापेक्षा एक हटके आणि सुपरहिट चित्रपट दिले. किशोरी शहाणे यांनी चित्रपटांसह मालिकांमध्येही काम केले आहे. सध्या त्या ‘कैसे मुझे तुम मिल गये’ या मालिकेत काम करत आहेत.