मुंबई – आपल्या पत्नीच्या अंगावर कार धडकवून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून मुंबई पोलिसांनी चित्रपट निर्माता कमल किशोर मिश्रा यांना अटक केली. ही घटना 19 ऑक्टोबर रोजी अंधेरी (पश्चिम) येथील दाम्पत्याच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये घडली होती जेव्हा मिश्रा यांच्या पत्नीने तो कारमध्ये अन्य एका महिलेसोबत असल्याचे पाहिले होते. त्यावरून झालेल्या वादातून पतीने आपल्या पत्नीच्या अंगावर कार घालून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला असे पोलिसांनी सांगितले.
‘देहाती डिस्को’ या हिंदी चित्रपटाचे निर्माते मिश्रा यांना त्यांच्या पत्नीने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. शुक्रवारी पहाटे या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली, असे अधिकाऱ्याने सांगितले.
मिश्राची पत्नी आपल्या पतीला शोधत बाहेर आली त्यावेळी तिला पार्किंग एरियात आपला पती कारमध्ये अन्य एका महिलेसोबत आढळला. त्यावेळी मिश्राने घटनास्थळावरून पळून जाण्यासाठी कार चालवली आणि या प्रक्रियेत पत्नीला धडक दिली, ज्यामुळे तिचे पाय, हात आणि डोक्याला दुखापत झाली आहे.