अमेरिकेत एका रस्ते अपघातात तीन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य पाच जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एका ट्रकला कारची धडक बसली. बर्कशायर जिल्हा मुखत्यार कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे की,’हा अपघात पश्चिम मॅसॅच्युसेट्समध्ये झाला आहे. एका पिकअप ट्रकला कार धडकली, ज्यामुळे भारतातील तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.’
निवेदनात पुढे म्हटले आहे की,’प्रेम कुमार रेड्डी गोडा (27), पवनी गुल्लापल्ली (22) आणि साई नरसिंहा पटमसेट्टी (22) अशी मृत्यू झालेल्या तीन भारतीय विद्यार्थ्यांची नावे आहेत. मॅसॅच्युसेट्स राज्य आणि स्थानिक पोलीस दोन वाहनांच्या समोरासमोर झालेल्या टक्कर प्रकरणाचा तपास करत आहेत. निवेदनात म्हटले आहे की या अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.’